
रविवार, 05 ऑक्टोबर 2025, रोजी Global Pagoda येथे पूज्य गुरुजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक दिवसीय महाशिविर आयोजित केले आहे. या महाशिविरात सहभागी होण्यासाठी प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे, जेणेकरून प्रत्येक धर्मप्रेमी, साधक आणि इच्छुक व्यक्ती या पुण्यदिवशी सहभागी होऊ शकेल.
-
एक दिवसीय कोर्स: जुने साधक ज्यांनी कमीत कमी एक 10 दिवसीय विपश्य कोर्स केले आहे असे साधक ह्या एक दिवसीय ध्यान साधनेचा लाभ घेऊ शकतात डी ध्यान करणारे साधक या दिवसभराच्या अभ्यासक्रमात संपूर्ण वेळ सहभागी होऊ शकतात आणि गुरुजींच्या शिकवणीचा अनुभव घेऊ शकतात.
-
ज्यांनी अद्याप 10 दिवसीय कोर्स केलेला नाही त्यांच्यासाठी सुधा ध्यान साधनेचे आयोजन मिनी पॅगोडा मध्ये केले जाते.
-
बुद्ध पेंटिंग गॅलरी: विविध शैलीतील प्राचीन व आधुनिक बुद्ध चित्रकला पाहता येईल, जी ध्यान आणि धर्माच्या शिकवणीशी संबंधित आहे.
-
व्हिडिओ गॅलरी: गुरुजींचे उपदेश, ध्यान तंत्र आणि धम्माशी संबंधित माहितीचे व्हिडिओ येथे पाहता येतील.
-
सुंदर लॉन्स व विश्रांती क्षेत्रे: शांतीत वेळ घालवण्यासाठी आणि परिवारासोबत थोडा वेळ रमण्यासाठी.
-
मुलांसाठी खेळाचे मैदान: लहान मुलांसाठी सुरक्षित व आनंददायी जागा.
-
धम्मा ज्ञान केंद्र: जिथे ध्यान, जीवनशैली, आणि बुद्धांच्या शिकवणुकी विषयी अधिक माहिती मिळेल.
या महाशिविराद्वारे सहभागी होणाऱ्यांना केवळ ध्यानाचा अनुभव मिळणार नाही, तर धम्माच्या विविध पैलूंचा अभ्यास, कला, संस्कृती आणि शिक्षणाचा अनुभव देखील घेता येईल. चला, या दिवशी एकत्र येऊन पूज्य गुरुजींच्या शिकवणीचा सन्मान करू आणि त्यांच्या पुण्यतिथीला अभिवादन व्यक्त करू. 🙏