मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार संभाजी निलंगेकर आणि निवडणूक आयोग दोषी ?
अभय साळूंके यांचा पत्रकार परिषदेत घणाघात..
लातूर,दि. 02
निलंगा नगर परिषद निवडणूक अचानक रद्दमुळे निलंग्यातील राजकारणात तापले असून काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळूंके यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या घटनेवर गंभीर आरोप करत म्हटले की,निवडणूक रद्द होणे ही साधी प्रशासकीय चूक नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार संभाजी निलंगेकर आणि निवडणूक आयोग यांच्या गुप्त मिलीभगतामुळे झाली आहे.
साळूंके पुढे म्हणाले की, “निलंगा नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना अचानक रद्द करणे लोकशाहीसाठी मोठा धक्का आणि नागरिकांसाठी विश्वासघात ठरला आहे. ही कृती राजकीय स्वार्थ आणि पक्षीय प्राधान्य यांच्या हातून जाणीवपूर्वक केली गेली आहे.”
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग यांची मिलीभगत करून निवडणूक रद्द केली. तर आमदार संभाजी निलंगेकर यांनी ही कृती जाणीवपूर्वक केली असल्याचे नमूद केले.
काँग्रेसने संबंधित सर्व घटनेवर तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. साळूंके म्हणाले की, जनतेचा विश्वास आणि लोकशाही प्रक्रियेचा अपमान झाल्याचे स्पष्ट आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या घटनेमुळे नगर परिषद निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलू शकते, तसेच निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास खच्चीकरण होण्याचा धोका आहे.
या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष अभय साळूंके , नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते..