निलंगा,दि.११
निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी कन्या प्रशाला निलंगा येथे बुथ पाहणी केली. निवडणूक केंद्रावरील सर्व तयारी, सुविधा आणि सुरक्षेची स्थिती यांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल दुमे व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर कोणतीही उणीव राहू नये, सर्व व्यवस्था पूर्णपणे तयार ठेवाव्यात, असे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले.
निलंगा नगरपरिषद निवडणूक सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी तात्काळ पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.