डॉ.गुणवंत बिरादार
लातूर,दि.२७
भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणारी धोरणे रचणारे व अंमलात आणणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख, असे होते प्रतिपादन डॉ. गुणवंत बिरादार यांनी केले. गरीब व कष्टकरी शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडणारे ते खरे शेतकऱ्यांचे कैवारी होते, असेही त्यांनी नमूद केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे जयंती उत्सव समिती आणि महाविद्यालयाच्या वतीने डॉ. देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात डॉ. गुणवंत बिरादार हे प्रमुख मार्गदर्शक होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. आनंद शेवाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रो. डॉ. आनंद शेवाळे यांच्या हस्ते डॉ. देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन नामदेव बेंदर्गे, आभार प्रदर्शन डॉ. संजय गवई यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय गायकवाड, शिवशंकर खुब्बा आणि गुरुप्रसाद बिरादार यांनी विशेष परिश्रम घेतले.