
पुणे:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या लोकप्रिय पुस्तकाच्या प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. सम्राट अशोकाच्या विजयादशमीच्या (धम्मचक्र प्रवर्तन दिनी) शुभमुहूर्तावर या पुस्तकाची हीरक महोत्सवी (६० वी) आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे.
लेखक जगदीश ओहोळ यांनी ही माहिती देताना सांगितले की, जगभरातील वाचकांनी या पुस्तकाला दिलेले अभूतपूर्व प्रेम आणि प्रतिसाद यामुळेच हा विक्रम करणे शक्य झाले आहे. ६० व्या आवृत्तीच्या प्रकाशनामुळे पुस्तकाचा प्रवास अविस्मरणीय ठरला आहे.
या विशेष प्रसंगी लेखक जगदीश ओहोळ यांनी सर्व वाचकांचे आभार मानले असून, सर्वांना सस्नेह जयभीम म्हटला आहे.
या निमित्ताने, ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाने केवळ वाङ्मयीन यशच नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगभर पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे स्पष्ट होते.
संदर्भ: जगदीश ओहोळ | लेखक