लातूर,दि. 05(मिलिंद कांबळे)
कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र दिवशी धम्म अंकुर बुद्ध विहार, हालसी (हात्तरगा) ता. निलंगा, जि. लातूर येथे शनिवार दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९:३० वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहण व धम्म रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सकाळी ११ ते १२ या वेळेत भिक्खू संघास भोजनदान व बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२:१५ वा. बुद्ध विहार भूमिपूजन तर १२:३० वा. धम्म परिषदेचे उद्घाटन पार पडेल. सायंकाळी ५:३० वाजता चिवर दान सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता होईल. या परिषदेत पूजनीय भिक्खू धम्मनाग महाथेरो (हत्याळ), भिक्खू महावीरो थेरो (काळेगाव), भिक्खू पय्यानंद थेरो (महाविहार लातूर), भिक्खू नागसेनबोधी थेरो (उदगीर), भिक्खू धम्मसार (किल्लारी), भिक्खू सुमंगल (कराळी) यांची धम्मदेसना होणार असून कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक पूजनीय भिक्खू सुमेधजी नागसेन (बुद्ध लेणी, खरोसा) असतील. या परिषदेला मा. आयु. इंजी. दत्ता नागनाथ सूर्यवंशी (सेवानिवृत्त सिव्हिल इंजि., पुणे), मा. आयु. मधुकर श्रीपती सूर्यवंशी (बोधाचार्य व समाजसुधारक), मा. झुंबरभाऊ कल्याणी बनसोडे (समाजसेवक), मा. महानंदा दत्तात्रय बिराजदार (सरपंच हालसी), मा. प्रवीण राठोड (पोलीस निरीक्षक कासार सिरसी), मा. आयु. दत्तात्रेय संभाजी कांबळे व मा. बसवंत त्र्यंबकराव पाटील (हालसी) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संघमित्रा कलापथक (हात्तरगा) व कला मंच अंबुलगा यांच्या वतीने “भीम ज्योत समाज प्रबोधन कार्यक्रम” सादर होणार असून बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून समाजात समता, शिक्षण व जागृतीचा संदेश दिला जाणार आहे. या ऐतिहासिक धम्म परिषदेचे आयोजन मा. नागेश प्रताप आवले (उपसरपंच हालसी), मा. बालाजी किशन आवले (माजी सरपंच हालसी), मा. गुणवंत नानाराव (पोलीस पाटील) यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून अध्यक्ष फुलचंद चंद्रकांत सूर्यवंशी व उपाध्यक्ष वसंत तुकाराम कांबळे आहेत.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (हालसी) तसेच सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक–उपासिका यांचे सहकार्य लाभले आहे.धम्म अंकुर बुद्ध विहार परिसर या निमित्ताने सज्ज झाला आहे.