लातूर, दि.14
भारतीय बौद्ध महासभा लातूर (पश्चिम) जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची संयुक्त व अत्यंत महत्त्वाची बैठक येत्या रविवार, दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाध्यक्ष आयु. आशाताई चिकटे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत संविधान अमृत महोत्सवाच्या भव्य नियोजनावर निर्णायक चर्चा होणार आहे.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या परंपरेनुसार आणि राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर तसेच राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हरीश रावलिया यांचे मार्गदर्शन लक्षात घेऊन कार्यक्रमाचे रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या सूचनांनुसार संविधानाच्या 75 वर्षांच्या अमृत पर्वाला समाजजागृती, संविधान प्रचार आणि बौद्ध समाजाच्या संघटनात्मक बळकटी या तीन प्रमुख आधारांवर साजरा करण्याचा मानस आहे.
या बैठकीत संविधान अमृत महोत्सवाची संकल्पना, जिल्हास्तरावरील कार्यक्रमांची रूपरेषा, धम्मदीक्षा समितीचे समन्वय, तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळीचे विषय यावर चर्चा होणार आहे.
या बैठकीस सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांनी वेळेत हजेरी लावून महोत्सव यशस्वी करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आशाताई चिकटे यांनी वृत्तरत्न सम्राटशी बोलताना केले.