निलंगा,दि.१० कोराळीवाडी ता.निलंगा जिल्हा लातूर या खेडे गावातील एका गरीब कुटुंबातील शेतमजुराचा मुलगा पोलीस झाला आहे.
कोराळी वाडीतील अंगद झेटिंगा गायकवाड या शेतमजुराच मुलगा भरत अंगद गायकवाड यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉनस्टेबल पदी निवड झाली आहे.
त्यांची निवड गावासाठी गावातील नवतरुण युवकांसाठी अभिमान आणि आदर्श ठरलं आहे.
यांचा तीन पिढ्यापासून गावात वास्तव्य असून आजोबा झेटिंग गायकवाड गावात कोणताही कार्यक्रम असो त्यामध्ये वाद्य वाजवणे, गावाची कोतवाली करणे, डांगोरी देणे आणि गावाची सेवा करणे, त्याबद्दल्यात गावकऱ्याकडून बलुतेदार म्हणून जे शेतात पिकेल ते दिले जात असत यावर आपली उपजीविका भागवत आणि इतर वेळी मोल मजुरी करून मुलांना शिक्षण दिले. अशा कठीण परिस्थितीतुन शिक्षण घेत परिस्थितीशी सामना करत परिस्थितीला दूर सारून भरत या युवकांने कुटूंबाच नाव उज्ज्वल करत स्वतःचं भविष्य बदल करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
या कार्यामुळे गावाकऱ्या कडून, मित्र परिवारा काडून आणि नातेवाईकंडून अभिनंदनाच वर्षाव होत आहे. तसेच त्याचे आई वडील आणि भावंडाणी गाव भर पेढे वाटून आनंद साजरा केला..