लातूर,दि.02(मिलिंद कांबळे )
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बौद्ध धर्म प्रचारक चॅरिटेबल ट्रस्ट आणि सर्व बौद्ध उपासक-उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेल्या आठव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची तयारी जोरात सुरू झाली आहे. या भव्य परिषदेच्या नियोजन, पूर्वतयारी व व्यवस्थापनासाठीची महत्वाची नियोजन बैठक दि. ७ नोव्हेंबर २०२५, शुक्रवार दुपारी १.०० वाजता, नालंदा बुद्ध विहार, प्रकाश नगर, लातूर येथे पार पडणार आहे.
या बैठकीस पु. भ. डॉ. उपगुप्त महाथेरो अध्यक्षस्थानी उपस्थित राहून परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीदरम्यान परिषदेसाठी आवश्यक असलेले विविध विभाग, स्वागत, निवासव्यवस्था, अन्नदान, धम्मप्रवचन मंच, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वयंसेवक संघटना आणि प्रसिद्धी यांचे नियोजन निश्चित केले जाणार आहे.
आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद ही बौद्ध समाजासाठी वर्षातील एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक व सांस्कृतिक पर्व ठरत असून, देशभरातून विविध प्रांतातील भिक्खू संघ, धम्मप्रवचक, उपासक-उपासिका, तसेच तरुण धम्मसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. धम्म, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी सर्व बौद्ध बंधूंनी, भगिनींनी, तसेच धम्मप्रेमींनी नियोजन बैठकीस वेळेवर उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे भिक्खू पय्यानंद थेरो यांनी आवाहन केले आहे.