निलंगा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबुलगा बु (ता. निलंगा) येथे राष्ट्रीय शिक्षण दिन ते बालदिन असा चार दिवसांचा उपक्रमांचा आठवडा उत्साहात साजरा करण्यात आला. पुस्तक प्रदर्शन, चित्रकला, जी.के. परीक्षा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांचे वाढदिवस, पुस्तक भेट, आरोग्य तपासणी व वृक्षलागवड असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमापूजनाने झाली. तसेच बालदिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
उद्घाटन मुख्याध्यापक शिवशंकर मिरगाळे यांनी केले. मार्गदर्शन गटविकास अधिकारी पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी व केंद्रप्रमुख तेलंग यांनी केले. विद्यार्थ्यांनी सलग सहा तास अवांतर वाचन करून उपक्रमात सहभाग दिला.
या कार्यक्रमास सदानंद बिरादार, संदीप पाटील, अरविंद चव्हाण, किरण शिंदे, उपसरपंच जगदीश सगर, गणेश तुबाकले सर, गिरी सर, पाटील सर, मिरगाळे मॅडम, बिराजदार मॅडम, शानिमे मॅडम, स्वाती मॅडम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार दिनेश कांबळे यांनी मानले.