युवा भिम सेनेची मागणी
लातूर,दि.०४(मिलिंद कांबळे )
मागील काळात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेती कामावर शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या शेतमजुरांवर ही आता उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्या सोबतच शेतमजुरांनाही सरकारने दिवाळीपूर्वी प्रत्येक परिवारास दहा हजार रुपयाची आर्थिक मदत करावी अशी मागणी युवा भीमसेनेचे तालुका अध्यक्ष धनराज कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, मे २०२५ पासून आजतागायत सतत चालू असलेल्या पावसामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नाही त्यामुळे शेतमजूर घरी बसून हलाखीचे जीवन जगत आहे. पावसामुळे शेतमजुरावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांनाही तात्काळ दहा हजार रुपयाची आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर युवा भीमसेनेचे तालुकाध्यक्ष धनराज कांबळे (अंबुलगेकर) यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.