लातूर, दि. 22
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बालरंगभूमी परिषद ही बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच बालमनावर कलासंस्कार घडावेत या अनुषंगाने कार्य करते.या परिषदेच्या लातूर अध्यक्ष पदी रणजित आचार्य तर सह कार्यवाहपदी रविकिरण सावंत यांची निवड करण्यात आली.
बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती, मुंबईचे उपाध्यक्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे यांच्या उपस्थितीत नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत पूर्व अध्यक्षा सुमती बिडवे सोमवंशी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्याच बैठकीत सर्वानुमते रणजित आचार्य यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली तर रणजित आचार्य यांच्या रिक्त झालेल्या सहकार्यवाह या पदावर रविकिरण सावंत यांची निवड झाली. या निवडीचे स्वागत सर्व शाखा पदाधिकारी यांनी केले. रणजित आचार्य व सहकार्यवाह म्हणून निवडी बद्दल अॅड. निलमताई शिर्के-सामंत, अभिनेत्री तथा अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती, मुंबई, अॅड. शैलेश गोजमगुंडे, उपाध्यक्ष, बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती, मुंबई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद लातूर चे प्रा. दिपक वेदपाठक, डॉ. मुकुंद भिसे, जेष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे, बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष मयूर राजापूरे, प्रमुख कार्यवाह नवलाजी जाधव, कोषाध्यक्ष रवी अघाव, उपाध्यक्षा सुवर्णा बुरांडे, हिरा वेदपाठक, कार्यकारिणी सदस्य वनिता गोजमगुंडे, सुमती बिडवे सोमवंशी, वसुधा पाटील, तेजश्री घवले, प्रिती ठाकूर, अॅड. बालाजी म्हेत्रे, सलीम पठाण, भिमराव दूनगावे, विशाल वाटवडे, शरीफ पठाण, तन्मय रोडगे, महेश पवार, महेश बिडवे, विश्वजित पांचाळ आदीसह लातूर मधील नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.