
भ .बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ
अनिल वैद्य,
माजी न्यायाधीश
आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात अणू, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या शोधाने विश्वाचे रहस्य समजून घेण्याचे नवीन दालन उघडले. 1897 मध्ये जे. जे. थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, तर 1917–1920 मध्ये अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध घेतला. 20व्या शतकात वैज्ञानिकांनी अणूचे स्वरूप व त्यातील कणांचे गतीमान अस्तित्व सिद्ध केले.
परंतु, आश्चर्य म्हणजे 2600 वर्षांपूर्वी तथागत बुद्धांनी कोणत्याही उपकरणाशिवाय, फक्त ध्यानाच्या सामर्थ्याने आणि अंतर्ज्ञानाच्या प्रकाशाने, हेच सत्य प्रत्यक्ष अनुभवलं होतं.
त्यांनी सांगितले –
“सब्बो पज्जलितो लोको, सब्बो लोको पकम्पितो।”
(संपूर्ण लोक प्रज्वलित आहे, संपूर्ण लोक प्रकंपित आहे.)
लोक म्हणजे विश्व.
भौतिक जगाचे स्वरूप कलाप सिद्धांत
बुद्धांच्या अनुभवांतून उमगले की आपल्याला दिसणारे शरीर व जग ठोस नाही. ते केवळ तरंग आहेत,हे भासमान सत्य आहे (Conventional Truth)
बुद्ध म्हणतात परमसत्य असे की जगातील सर्व पदार्थ सूक्ष्मतम घटकांनी (कलापांनी) बनलेले आहेत.
कलाप म्हणजे अणूपेक्षाही सूक्ष्म कण
बुद्धांनी कलाप हा शब्द वापरला. बुद्ध म्हणतात
तो कोणताही स्थिर कण नसून तरंगांचा पुंज आहे.
एका कलापात आठ घटक – पृथ्वी, जल, अग्नी, वायु व त्यांच्या गुणधर्मांचा समूह असतो.
त्यामुळे त्याला अष्टकलाप असे म्हणतात,
हे कलाप प्रतिक्षण उत्पन्न होतात व नष्ट होतात. त्यामुळे वस्तू आपल्याला ठोस भासते पण वास्तविक तो बुड बुदबुदा असतो. बुद्धांनी याला संततिघन म्हटले.अष्टकलाप हे अनुपेक्षाही सूक्ष्म असतात आणि ते पृथ्वी, तेज, आप, वायू या चार घटकांनी व चार त्यांचे गुणधर्म यांनी बनलेले आहेत, आणि उत्पन्न होणे आणि नष्ट होणे म्हणजेच उत्पाद- व्यय हा त्यांचा धम्म(गुणधर्म) आहे
विज्ञानाने जे “Sub-atomic Vibrations” म्हणून मांडले, त्याचा अनुभव बुद्धांनी प्रत्यक्ष ध्यानातून घेतला होता.
आता आधुनिक काळात
आधुनिक भौतिकशास्त्र मानते की विश्वातील प्रत्येक कण सतत गतिशील आहे. अणूतील इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे स्थिर नसून अखंड गतीत आहेत. फिरत आहेत.
बुद्धांनी याच सत्याला अनित्यता(Impermanence) असे नाव दिले.
त्यांच्या मतेप्रत्येक वस्तू उदय–व्ययधर्मी आहे.
उत्पन्न होणे व नष्ट होणे, अनित्य आहे हीच तिची प्रकृती आहे.
म्हणूनच शरीर वा जग काहीही शाश्वत नाही.
यामुळे बुद्धांचे म्हणणे विज्ञानाशी असलेले साम्य आपल्याला ठळकपणे दिसते. नव्हे बुद्धाने ते 2600 वर्ष पूर्वी शोधले.
आधुनिक विज्ञान सत्य शोधण्यासाठी प्रयोगशाळेचा वापर करते.
बुद्धांनी मन व शरीर हीच प्रयोगशाळा मानले.
बुद्धाने सतीपठ्ठान हा उपदेश केला. आणापानं सती व चार स्मृती उपस्थान सांगितले. ही बुद्धाची ध्यान पद्धती आहे.
यामध्ये ध्यान करणारा आपले श्वास, संवेदना, विचार व प्रतिक्रिया यांचे निरपेक्ष निरीक्षण करतो.
यामुळे त्याला भासमान सत्यापलीकडे जाऊन सूक्ष्म परमसत्याचा अनुभव येतो.
शरीर व चित्त हे तरंगांचे समूह आहेत, हे प्रत्यक्ष अनुभूतीत उतरते.
बुद्धांनी सांगितले की “दर्शन म्हणजे मत नव्हे, तर जाण्यता आहे.”
म्हणजेच, सत्य हे मतांत, कल्पनांत वा परंपरेत नाही, तर प्रत्यक्ष अनुभूतीत आहे.
बुद्ध – मनोविज्ञानाचे जनकसुद्धा होते.
बुद्धांचे योगदान फक्त भौतिक सत्यापुरते मर्यादित नाही, तर ते मानवी मानसशास्त्राचेही जनक आहेत.
त्यांनी दुःखाचे मूळ तृष्णा व अज्ञान यात शोधले.
त्यांनी मानवी स्वभाव बदलण्याचा मार्ग – आर्य अष्टांगिक मार्ग – दिला.
त्यांनी ध्यानाद्वारे मनाचे शुद्धीकरण व विचारांचे रूपांतर करण्याची पद्धत जगाला दाखवली.
आज आधुनिक मानसशास्त्र “Mindfulness”, “Behavioural Therapy” यांची चर्चा करते. पण त्यांची मूळ प्रेरणा बुद्धांच्या ध्यानशास्त्रात अर्थात सतीपठ्ठान मध्ये आहे. भौतिक व मानसिक जगाची
साधन प्रयोगशाळा मन व शरीर हेच आहे
आज विज्ञानाने जे सिद्ध केले आहे ते बुद्धांनी आधीच अनुभवलं आहे.
म्हणून बुद्धांचे विचार सिद्ध करण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता नाही. उलट विज्ञानालाच बुद्धांच्या अनुभूतीतून दिशा मिळते.
बुद्ध हे केवळ धर्मसंस्थापक नव्हते; ते जगातील पहिला महान भौतिक, वैद्यक आणि महान मनोवैज्ञानिक होते.
त्यांनी जगाला शिकवले की
सत्य हे प्रत्यक्ष अनुभूतीत आहे.
अनेक वैज्ञानिक, तत्त्वज्ञ आणि न्यूरोसायन्स तज्ञांच्या दृष्टिकोनातून बुद्धांच्या शिकवणुकींचे वैज्ञानिक दृष्ट्या आकलन, त्यांचे गुण, आणि त्यांच्या विचारांच्या सुव्यवस्थितपणे संज्ञानात्मक आणि भौतिकशास्त्रीय अर्थांची चर्चा केली आहे:
प्रसिद्धवैज्ञानिकांच्या बुद्धा विषयीच्या टिप्पणी अशा की,
निल्स बोहर (Niels Bohr) यांनी, आणि
जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांनी,आणि अल्बर्ट आइंस्टीन यांनी बुद्धांच्या विचारांमध्ये आधुनिक भौतिकशास्त्राशी साम्य असल्याचे स्पस्ट केले आहे.
दलाई लामा यांनी विज्ञान आणि बुद्धधर्म यांची तर्कशुद्ध तुलना केली आहे.
“मी माझा विश्वास विज्ञानाप्रमाणेच बुद्धधर्मही सत्याचा शोध अनुभवातून घेण्याचा मार्ग मांडतो… जर विज्ञानाने निर्विवादपणे बुद्धधर्मातील कोई गोष्ट खोटी ठरवली तर आम्ही ती स्वीकारून त्याला सोडून द्यायला तयार आहोत.३. तत्त्वज्ञ आणि न्यूरोसायन्समध्ये संतुलन
बी ॲलन वाल्स
(B. Alan Wallace) म्हणतात की बुद्धधर्म एक सुव्यवस्थित तत्त्वज्ञ आणि अनुभव-आधारित प्रणाली आहे, विशेषतः मानसिक अवस्थांवर केंद्रित आहे (ज्ञान-मनोविज्ञान) — जे विज्ञानाला पूरक आहे.
रॉबर्ट तुरुमन
(Robert Thurman) बुद्धाच्या ध्यानाला “आंतरिक विज्ञान” (inner science) म्हणतात आणि चेतनेच्या अभ्यासाला भौतिकवादाच्या सीमापलीका म्हणून
पाहतात.
ट्रिंग जुहान थूआन
(Trịnh Xuân Thuận,) खगोलशास्त्रज्ञ, बुद्धधर्म आणि विज्ञान यांना समांतर ज्ञानाचे दोन मार्ग मानतात आणि “उभय दृष्टिकोनांत संवाद फायद्याचा ठरू शकतो” असा विश्वास व्यक्त करतात.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या अभिधम्म या ग्रंथाला
मेट्यफिसिक्स म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या पाली शब्दकोशात खंड 16 मध्ये पुढील अर्थ नमूद केला आहे.
अभिधम्मो = Higher doctrine transcendental
अभिधम्मं, doctrine
Metaphysics.
मराठीत मेटाफिजिक्सचा अर्थ तत्त्वमीमांसा असा होतो, जो अस्तित्व, वस्तू आणि त्यांचे गुणधर्म, शक्यता, कार्यकारणभाव, अवकाश (space) आणि काळ (time) यांसारख्या वास्तवाच्या सामान्य स्वरूपाचा अभ्यास करणारी तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. हा विषय सर्व विशिष्ट विज्ञानांना आणि ज्ञानशाखांना आधारभूत असलेल्या गृहितकांचा अभ्यास करतो.
या वरून तथागत बुद्ध किती महान संशोधक होते याची कल्पना यावी!
संदर्भ
- संयुक्त निकाय, १.१.१६८, उपचालासुत्त
- क्या बुद्ध नास्तिक थे? गोयंका, एस. एन
पान 99
3 डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 16 पान 538
अनिल वैद्य
5 सप्टेंबर 2025
✍️✍️✍️✍️