निलंगा,दि.०१
०१ जानेवारी २०२६ रोजी अशोक नगर बुद्ध विहार, निलंगा येथे 208 वा भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा निलंगा आणि समता सैनिक दल निलंगा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि 500 शूर वीरांना मानवंदना देण्यात आली.
1818 मध्ये पेशव्याच्या अत्याचाराविरुद्ध महार सैनिकांनी आपल्या न्यायासाठी आणि सन्मानासाठी उभ्या राहून केलेला रणसंग्राम आजही प्रेरणादायी ठरतो.
या कार्यक्रमास डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष तानाजी सुरवसे, जयंती सहकोषाध्यक्ष अमित गायकवाड, शहराध्यक्ष धम्मानंद काळे, केतन सुरवसे, समता सैनिक दल प्रमुख विशाल गायकवाड, इंद्रजित कांबळे , बी. आर. धैर्य आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी इंद्रजित कांबळे सर यांनी सांगितले की, समता सैनिकांमध्ये सामील होणे आवश्यक आहे, जेणेकरून समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करता येईल. विशाल गायकवाड यांनी शौर्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, अशोक नगर निलंगा यांनी केले.