
📰 बातमी दिनांक : ६ सप्टेंबर २०२५, ठिकाण – हलगरा, ता. निलंगा, जि. लातूर
🌸 इदे मिलादुन्नबी 🌸 या पवित्र दिनानिमित्त हलगरा येथे सामाजिक बांधिलकीची जपणूक करत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात गावातील तरुण, ज्येष्ठ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदान ही सर्वश्रेष्ठ समाजसेवा आहे, याची जाणीव ठेवून तब्बल ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले अमूल्य योगदान दिले.
गावातील सर्व रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आयोजक व उपस्थित ग्रामस्थांना अभिमान वाटला. या शिबिराद्वारे समाजात रक्तदानाविषयी जागरूकता वाढविण्यासोबतच निःस्वार्थ सेवा करण्याचा एक प्रेरणादायी संदेश दिला गेला.
स्थानिक युवक मंडळे, सामाजिक संस्था आणि गावातील नागरिकांनी मिळून या कार्यक्रमाला मोठे यश मिळवून दिले. रक्तदात्यांचा सन्मान करून त्यांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.