जाधव कुटुंबियांना आणखीन मदतीची गरज…
किल्लारी,दि.११
औसा तालुक्यातील मोगरगा येथील भारतबाई भाऊसाहेब जाधव या सध्या अन्ननलीकेचा कॅन्सर ने त्रस्त असुन दरमहा ७० हजार रुपये खर्च येत असल्याने मोगरगा येथील भाऊसाहेब शेषेराव जाधव हे आर्थिक विवंचनेत होते. त्यांची ही माहिती मिळताच लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी त्यांच्या मित्र परिवारास आवाहन केले व स्वतः अशी ५० हजाराची मदत केली आहे.
लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी मोगरगा येथील भारतबाई भाऊसाहेब जाधव यांना अन्ननलीकेच्या कॅन्सर च्या उपचारासाठी आतापर्यंत २० लाख रुपये खर्च झाले. घरची बचत संपली. दागदागीने संपले, पुढील उपचारासाठी १६ लाख रूपयांची गरज जाधव परिवाराला आहे. ही गरज ओळखून लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी मित्र परिवाराच्या मदतीने मदत करून जाधव परिवाराला आधार दिला.
तसेच या परिवाराला पुढील मदतीसाठी संजय राजुळे यांनी मदतीचे आवाहन केले असुन समाजातील दानशूर व्यक्तीनी शक्य तेवढी मदत करावी .