लातूर,दि.09(मिलिंद कांबळे)
शहरालगत असलेल्या गरुड चौकापासून नांदेडला जाणाऱ्या हायवेवर रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक सीएनजी टँकर लिकेज झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली.पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तब्बल दोन तासानंतर प्रेशर कमी झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आली व वाहतूक सुरळीत करण्यात आली.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता एक टँकरमधून सीएनजी लिकेज सुरू झाल्याचे लक्षात आल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले, त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या तरी लिकेज थांबवणे शक्य झाले नाही, त्यामुळे संपूर्ण सीएनजी स्वतःहून बाहेर पडून टँकरमधील दाब कमी होईपर्यंत, म्हणजे तब्बल दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली.सुदैवाने, अग्निशामन बंब वेळेत पोहोचला आणि कोणतीही भीषण घटना घडली नाही. पोलिसांनी तातडीने वाहतूक थांबवून नागरिकांना दूर ठेवले, त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. मात्र, कुतूहलाने बघ्यांची मोठी गर्दी या परिसरात झाली होती.
सकाळी सुमारे ११:४५ वाजता, टँकरचा दाब कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, आणि नांदेड रोडवरील वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. या संपूर्ण घटनेमुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प राहिली.तज्ज्ञांच्या मते, सीएनजी उघड्या हवेमध्ये लिक झाल्यास तात्काळ पेट घेत नाही, मात्र अशा घटना शहराच्या मध्यभागी झाल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने सीएनजी वाहतुकीच्या सुरक्षेचे निकष अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे वेळेवर आगमन झाल्याने संभाव्य धोका टळला.या घटनेवरून सीएनजी वाहतूक सुरक्षितपणे करणे किती गरजेचा आहे याबाबत आणखीन निकष शासनाने तपासून अशा प्रकारच्या गाड्या रस्त्यावरती सोडणे किती घातक आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.सीएनजी टँकर लिकेज झाल्याच्या नंतर उघड्या हवेमध्ये जर हे लिकेज असेल तर सीएनजी तात्काळ पेट घेत नाही.हीच घटना जर शहरात घेतली असती तर धोका जास्तीचा होता.लातूर शहर महापालिकेचे अग्निशमन बंब वेळेत आले त्यामुळे सुरशिता राहिली भीती संपली, पोलिसांनी वाहतूक थांबली परंतु कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.अखेर पावणे सीएनजी टँकरचे आपोआप प्रेशर कमी झाले. आणि सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.