निलंगा, दि. २४
निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि भाजपवर सरळ, कटाक्षात टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. “निलंग्यात काँग्रेस ही भाजपची ‘बी टीम’ म्हणूनच काम करत आहे,” असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा निंबाळकर यांनी केला.
नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निंबाळकर म्हणाल्या,
“निलंग्याच्या राजकारणाचे नियंत्रण स्थानिकांच्या हातात नाही. भाजपचा कारभार औशातून, तर काँग्रेसचा कारभार बाभळगावातून चालवला जात आहे. दोन्ही पक्षांवर बाहेरून आदेश येतात आणि स्थानिक पातळीवर काँग्रेसच भाजपला मदत करताना दिसते. निलंग्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे दोन्ही पक्ष मिळून करीत आहेत.”
आगामी निवडणुकीत काँग्रेस–भाजपच्या या कथित ‘गुप्त समझोत्याचा’ पर्दाफाश करण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला
जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद,महिला जिल्हाध्यक्षा सौ.मंजुषा निंबाळकर,अध्यक्ष पदाचे उमेदवार मुजीब सौदागर, डॉ.हिरालाल निंबाळकर, तालुका प्रभारी देवदत्त सूर्यवंशी तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
या घणाघाती आरोपांमुळे निलंग्यातील राजकीय वातावरण आणखी चुरशीचे होण्याची चिन्हे आहेत.