152 बेशिस्त रिक्षाचालकांकडून 1लाख 22 हजारांचा दंङ वसुल..
लातूर,दि. 10(मिलिंद कांबळे)
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीसह बेशिस्त वाहनचालकांना आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई केली जात असून,याचाच एक भाग म्हणून 152 वाहन चालकांविरोधात कारवाई करून 1 लाख 22 हजार 650 रुपयांचा दंङ वसुल करण्यात आला आहे.
शहरात रिक्षाचालक सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असून रिक्षाचालकांकडून फ्रंटशिटला प्रवासी घेणे, गणवेष परिधान न करणे, रोडवर बेशिस्तपणे कोठेही थांबून प्रवासी चढ-उतार करणे, चौका-चौकांमध्ये वळणावर प्रवासी घेण्यासाठी रिक्षाची दुहेरी रांग करुन थांबवणे इत्यादीमुळे सामान्य नागरिकांना विनाकारण रहदारीस अडचण निर्माण होवून त्रास होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने तसेच ट्रिपल सिट मोटार सायकलबर प्रवास करणारे, विना कागदपञ, इन्शुरन्स, पिव्हीसी संपलेले व सोबत न बाळगणारे वाहन चालकाबर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे चालकावर व ईतर वाहनावर मोटार वाहन अधिनियमान्वये कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विद्वल दराडे यांच्या नेतृत्वात विशेष मोहिम राबविणे सुरू असून याचाच एक भाग म्हणून सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 152 रिक्षा चालकांवर कारवाई करून 1 लाख 22 हजार 650 रुपयांचा दंङ वसुल केला आहे. याबरोबरच ऑनलाईन कारवाई नंतरही दंडाची रक्कम न भरणाऱ्या वाहन चालकांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी दिली आहे..