डोंगराळेतील ३ वर्षांच्या यज्ञावर अमानुष अत्याचार व हत्या – सुवर्णकार समाजात संतापाची लाट; दोषींना तात्काळ फाशीची मागणी
लातूर, दि.23
मालेगाव तालुका (जि. नाशिक) येथील मौजे डोंगराळे गावात सुवर्णकार समाजातील केवळ तीन वर्षांच्या चिमुकली कु. यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या क्रूर अत्याचारानंतर निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. या भीषण घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा सोनार समाज असोसिएशन, लातूर यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, लातूर यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेने आपल्या निवेदनात म्हणटले आहे कीं निष्पाप बालिकेला न्याय मिळावा आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे नमूद केले.टसरच या निवेदनत:सदर गुन्हा फास्टट्रॅक न्यायालयात वर्ग करून खटला तातडीने चालवावा.दोषींना फाशीची शिक्षा होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा संबंधित प्राधिकरणांकडे तातडीने करावा.अशा घृणास्पद घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या.अश्या मागण्या करण्यात आल्या असून सदर निवेदन लातूर जिल्हा सोनार समाज असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ हरिभाऊ बोकन यांच्या नेतृ्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओमअप्पा धरणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. गणेश गोमचाळे, तालुका अध्यक्ष राहुल भुतडा, समाजाचे गजेंद्र बोकन, शिवसेनेचे आकाश बजाज, गणेश बेद्रे, पुष्कर उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते.निवेदनाद्वारे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन या गंभीर प्रकरणात न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना आदर्श शिक्षा व्हावी, अशी ठाम भूमिका सोनार समाजाने घेतली आहे