
मुंबई, 7 ऑक्टोबर 2025 — इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकात आज ऐतिहासिक क्षण घडला. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या पायाचे विधिवत पूजन पूज्य भन्तेगण आणि आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या पूजन कार्यक्रमाला अनेक मान्यवर, बौद्ध भिक्षुसंघ, अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पूजनानंतर स्मारक परिसरात “जय भीम” आणि “बुद्धं शरणं गच्छामि” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
इंदू मिल स्मारक हे डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे, कार्याचे आणि योगदानाचे प्रतीक म्हणून उभे राहत आहे. या पूजन कार्यक्रमामुळे स्मारकाच्या उभारणीच्या कार्याला नवा अध्याय लाभला आहे.
✍️ — BRambedkar.in न्यूज डेस्क