
📰 बातमी
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हालगरा गावातील फय्युम निजामुद्दीन चिकले या होतकरू तरुणाची निवड पालघर जिल्ह्यात महसूल सहाय्यक या पदासाठी झाली आहे.
नियुक्तीपत्राचे वितरण माननीय श्री. गणेश नाईक (मंत्री, वन विभाग व पालकमंत्री, पालघर जिल्हा) यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी पालघरचे खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, तसेच जिल्हाधिकारी इंदू राणी जाखर यांची प्रमुख उपस्थिती होती.
फय्युम चिकले यांची ही कामगिरी हालगरा गावासह संपूर्ण निलंगा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे स्थानिक तरुणाईला प्रेरणा मिळणार आहे.