-स्वातीताई गायकवाड
लातूर, दि. 11
भारतीय बौद्ध महासभा, केंद्रीय कार्यालय मुंबई यांच्या वतीने देशभर झालेल्या अखिल भारतीय बौद्धाचार्य परीक्षेत लातूर केंद्रावर १५ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय शिक्षिका स्वातीताई गायकवाड (मुंबई) म्हणाल्या की, “धम्म चळवळ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची असेल तर प्रत्येक गावात बौद्धाचार्य आणि प्रत्येक घरात समता सैनिक घडवणे ही काळाची गरज आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून जर प्रत्येक धम्मसेवक कार्यरत झाला, तर भारत बौद्धमय होण्यास वेळ लागणार नाही.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशाताई चिकटे होत्या. प्रास्ताविक गौतम बनसोडे, सूत्रसंचालन अभिमन्यू लामतुरे व आभारप्रदर्शन प्रेमनाथ कांबळे यांनी केले. या प्रसंगी प्रा. बापूसाहेब गायकवाड, राजाराम साबळे, श्रीमंत कांबळे, कविताताई, मायाताई व सुरेखाताई कांबळे, विलास आल्टे, एस. एम. गायकवाड, अर्जुन कांबळे, भाऊराव कांबळे, अशोक कांबळे, प्रकाश अडसुळे आदी मान्यवर उपस्थित होते.