लातूर, दि.० २
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघामार्फत आयोजित ग्रंथपालन प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेला धडाक्यात सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर कापसे व कार्यवाह राम मेकले यांनी दिली.
हुतात्मा स्मारक, लातूर येथे ०१ डिसेंबरपासून २० डिसेंबरपर्यंत सकाळी ११.३० ते सायंकाळी ०५ या वेळेत प्रवेश अर्ज स्वीकारले जात आहेत. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, शाळा, महाविद्यालये, न्यायालये, आरोग्य विभागातील ग्रंथालये तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षित ग्रंथपालांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, प्रमाणपत्रधारकांना तातडीने रोजगार मिळण्याची दाट शक्यता आहे.
उमेदवारांसाठी किमान बारावी उत्तीर्ण पात्रता आवश्यक असून अर्जासोबत बारावीचे गुणपत्रक, सनद, टी.सी., अनुभव प्रमाणपत्र(असल्यास)आधारकार्ड व तीन पासपोर्ट फोटो जोडणे अनिवार्य आहे.
जानेवारी ते जून सहा महिन्यांचे दर्जेदार प्रशिक्षण असून हा प्रशिक्षण वर्ग १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत सहा महिन्यांचा असून, दर शनिवार आणि रविवारी सकाळी० ९ ते दुपारी ०२ या वेळेत नियमित वर्ग आयोजित केले जातील. उपस्थिती बंधनकारक असून, प्रशिक्षणात अनुपस्थितीवर कडक भूमिकेतून कार्यवाही केली जाणार आहे.
प्रशिक्षित उमेदवारांना ग्रंथालय व्यवस्थापन, पुस्तक वर्गीकरण, नोंदी, तांत्रिक प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान वापर, वाचनालय संचालन अशा सर्व आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, शाळा व महाविद्यालयांत कार्यरत किंवा नियुक्तीची शक्यता असलेल्या उमेदवारांना प्रवेशात प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. अनेक संस्था प्रशिक्षित ग्रंथपालांना तातडीने कामावर घेण्यासाठी उत्सुक असल्याचेही संघटनेने सांगितले.
ग्रंथालय क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध असून अधिक
माहिती आणि ज्ञानयुगाच्या काळात वाचनालये व ग्रंथालय व्यवस्थापनाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डिजिटल युगातही ‘प्रोफेशनल ग्रंथपाल’ ही मागणीची ठरलेली व्यावसायिक संधी असल्याने, लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी आणि ग्रंथालय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी मानली जात आहे.अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावे ७७०९९७०७७५ / ८८५५००८०५७