२७ व्या क्रीडामहोत्सवात ॲथलेटिक्समध्ये ब्राँझ; महाविद्यालयाचा गौरव उंचावला..
निलंगा,दि.०७
जय भारत कॉलेज ऑफ फार्मसी, दापका (ता. निलंगा) येथील बी. फार्मसी अंतिम वर्षाचा विद्यार्थी श्री. प्रेम राम मुळे याने २७ व्या राज्यस्तरीय क्रीडामहोत्सवात भव्य कामगिरी करत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धेत ब्राँझ मेडल पटकविले. या दमदार प्रदर्शनामुळे महाविद्यालयासह निलंगा तालुक्याचा क्रीडा क्षेत्रातील मान अधिक उंचावला आहे.
राज्यभरातील स्पर्धकांमध्ये काट्याची टक्कर असताना प्रेम मुळ्याने दाखवलेली जिद्द, शिस्त आणि उत्कृष्ट फिटनेस कौशल्य पूर्ण स्पर्धेत ठळकपणे उठून दिसले. विजयानंतर महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नांदेड येथील भव्य बक्षीस वितरण समारंभात माननीय प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते प्रेम मुळे याला पदक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी मा. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, लातूरचे लोकप्रिय खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, खा. रवींद्र चव्हाण, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती विशेष ठरली.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. वसंतराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्णा शिंदे, विश्वस्त श्री. अनिल भोईबार, तसेच सर्व अध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रेम मुळेचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
महाविद्यालयाने विश्वास व्यक्त केला की, “प्रेम मुळे भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही विद्यापीठ व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करेल.”