विद्यार्थ्यांना कर्तव्यपालन, विज्ञाननिष्ठा व स्वकष्टाची शिकवण…
निलंगा, दि.28
महाराष्ट्राचे माजी शिक्षण, महसूल व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री, माकणीचे थोर सुपुत्र कै. संग्रामजी माकणीकर साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय माकणी थोर येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. विक्रम माकणीकर (विश्वस्त, ग्रामविकास मंडळ, माकणी थोर) होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुभाष निंबाळकर (लातूर) व माजी पर्यवेक्षिका सुलोचना नोगजा (राजस्थान विद्यालय, लातूर) तसेच संस्थेच्या संचालिका डॉ. सुरेखाताई काळे उपस्थित होत्या.
शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. शिंदे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व कालकथीत संग्रामजी माकणीकर यांच्या कार्याचा गौरव केला.
स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी कु. पाटील प्रांजली शरद या विद्यार्थिनीला श्री. ज्योतीराव कदम यांच्यातर्फे रोख 1000 रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाता मनोगत आपले मनोगत व्यक्त करताना सुलोचना नोगजा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संविधान, कर्तव्य, अधिकार आणि नियम याबाबत सखोल मार्गदर्शन करून “संविधानाचे पालन llहीच खरी देशसेवा” असे प्रतिपादित केले.
सुभाष निंबाळकर यांनी श्रद्धा- अंधश्रद्धा, समाजातील वास्तव, आणि आजच्या राजकीय पातळीवर अंधश्रद्धेचा प्रभाव यावर परखड उदाहरणांसह भाष्य करत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले.
तर डॉ. सुरेखाताई काळे यांनी आजचे राजकारण समाजाभिमुख राहिले नसल्याची खंत व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात विक्रमजी माकणीकर यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा झुगारून स्वकष्ट, मेहनत आणि धैर्य याच्या बळावर पुढे जाण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.=विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी सौ. कल्पनाताई पाटील यांनी SSC मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 1200 रुपये व द्वितीय येणाऱ्यास 800 रुपयांचे वार्षिक पारितोषिक देण्याची घोषणा केली. तसेच सेवानिवृत्त शिक्षिका सौ. जानकी पवार मॅडम यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी 10,000 रुपयांची पुस्तके भेट देऊन योगदान दिले.
या कार्यक्रमाला सरपंच राहुल माकणीकर, उपसरपंच तुकाराम सूर्यवंशी, देवस्थान कमिटी अध्यक्ष मगरध्वज सूर्यवंशी, सचिव हणमंत सूर्यवंशी, पोस्टमास्तर चंद्रसेन येळीकर, तंटामुक्ती अध्यक्ष माधव सूर्यवंशी, तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन खोकले यांनी मानले.