
निलंगा,दि३१(मिलिंद कांबळे)
येथील भाजपाचे जेष्ठ नेते तथा संभाजीराव पाटील निलंगेकर परिवाराचे कट्ठर समर्थक किशोर उर्फ़ अरुण जाधव यांचे सुपुत्र पृथ्वीराज जाधव यांनी कर्करोगाशी झुंज देत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन करून तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
लातूर येथील केशवराज विद्यालयात सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेत असलेल्या पृथ्वीराजने सर्वच विषयांत विशेष प्राविण्य दाखवित गुण पटकावले.
पृथ्वीराज याला ई. स.मार्च २०१८ ला कर्करोग असल्याचे निदान झाले.तेंव्हापासून मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून पृथ्वीराज याने या आजाराशी झुंज देत आपल्या अभ्यासात खंड पडू दिला नाही.
पृथ्वीराज यांनी अपार कष्ट घेऊन स्वतःचे व परिवाराचे नाव उज्वल केले.

त्याच्या या यशात शाळेच्या सर्वच शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.
यापुढे कोणते शिक्षण घेऊन काय बनण्याची इच्छा आहे असे आमच्या प्रतिनिधीने पृथ्वीराज याला विचारले असता दर्जेदार शिक्षण घेऊन चांगला डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करणार असल्याचे पृथ्वीराज यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
पृथ्वीराज यांच्या या यशाबद्दल माजी खा.रुपाताई(अक्का) पाटील-निलंगेकर,स्थानिकआमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर, अरविंद पाटील-निलंगेकर,टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर्स, एस. डी. ओ. भवानजी आगे, ओ. एस. डी. संतोष राऊत यांच्यासह असंख्य मित्र परिवारातून ,शुभचिंतकातुन अभिनंदन पर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.