लातूर,दि.04
मौजे कासारसिरसी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे असलेल्या सी.ए.सी सेंटर मध्ये जनतेची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदार निलंगा यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, शासनाकडे अनेक कामासाठी सादर करावयाची कागदपत्रे ही त्यात नॉन क्रिमिनल,उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र असे अनेक कागदपत्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि वैयक्तिक नागरिकांच्या कामासाठी अत्यावश्यक असून ते काढण्यासाठी जनतेला सी एस सी सेंटरला जावे लागत असते ते प्रमाणपत्र काढून देण्याकरिता शासनाने नेमून दिलेल्या रक्कमेपेक्षा चौपट पैसे घेतले जात आहे. त्यामुळे जनतेची आर्थिक लूट होत आहे.
ती लूट थांबवून सीएसी सेंटरचे परवाने रद्द करून संबंधित संचालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशाप्रकारेचे लेखी निवेदन तहसीलदार निलंगा यांच्याकडे देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, ऑनलाईन सी ए सी सेंटर मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी लागत असलेल्या तसेच नागरिकांना आवश्यक असणारे प्रमाणपत्रे काढण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमानुसार प्रति प्रमाणपत्र काढण्यासाठी 70 रुपये आकारणीची नियमावली असताना येथील सीएसी बहाद्दर सर्रासपणे प्रति प्रमाणपत्र 300 रुपये घेतात.तर काही प्रमाणपत्र लवकर मिळवून देण्यासाठी प्रति प्रमाणपत्र 400 रुपये घेऊन विद्यार्थ्यां,पालक व नागरिकांची लूट करत असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील यांनी स्वतः त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नॉन क्रिमिनल आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी येथील सरवदे सी ए सी मध्ये २४ सप्टेंबर रोजी दिले असता २९ सप्टेंबर रोजी वरील दोन्ही प्रमाणपत्र काढून देऊन त्यांच्याकडून सहाशे रुपयेची मागणी करण्यात आली.
त्यावेळी एवढे रुपये का असे विचारले असता सीएसी चालक रवी सरवदे यांनी मी तहसील कार्यालय येथे कोतवाल म्हणून कार्यरत आहे हे प्रमाणपत्र लवकर काढून घेण्यासाठी मला संबंधित वरिष्ठांनाही हे पैसे द्यावे लागतात असे म्हणून मला तुम्ही पैसे सहाशे रुपये द्यावेच लागेल अशी मागणी करत अरे रावे ची भाषा करत सहाशे रुपये ची वसुली केली आहे अशाप्रकारे कित्येक नागरिकांचे लूट या ठिकाणी सर्रासपणे केली जात आहे.
संबंधित व्यक्ती कोतवाल या पदाचा दुरउपयोग करत असल्याने त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्याची सीएसी सेंटर परवाना रद्द करून त्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर व्यक्तीवर वेळेत आपल्या कार्यालया मार्फत कारवाई नाही झाल्यास संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी अस इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.