निलंगा, दि.22
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जा. क्र. 2025 जि.प. ला- सा प्र वी कार्य 2/का वी-99/25 नुसार स्थायी समिती सभागृह, जिल्हा परिषद लातूर येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे यांनी विविध विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न उपस्थित केले. याबाबत प्रशासनाशी सविस्तर चर्चा होऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची पदोन्नती तात्काळ करण्यात यावी.
अद्ययावत बिंदू नामावलीची प्रत महासंघास उपलब्ध करून द्यावी.
सातव्या वेतन आयोगातील त्रुटींवर शिक्षण विभागासह संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत.
निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन पुन्हा बहाल करण्याचा अधिकार कोणास आहे यावर चर्चा.
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे प्रस्ताव येत्या 15 दिवसांत काढण्याचे आश्वासन.
पदवीधर शिक्षकांच्या वेतन आयोगाशी संबंधित प्रस्ताव फाईल मूव्हमेंटमध्ये असून लवकरच पात्र शिक्षकांना लाभ.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाचे मानधन लवकरात लवकर जमा होणार.यासह खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या त्यात
महाराष्ट्र दर्शन बिल काढण्याचा अधिकार BEO यांना देण्यात यावा.
DCPS खात्यांचे हिशोब उपलब्ध करून द्यावेत.
GPF अंतिम अदा प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे निर्देश.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन नवीन GR नुसार अदा होत असल्याची नोंद.
समाजकल्याण विभागातील दिव्यांग शाळांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा.
स्वेच्छानिवृत्ती प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याची मागणी.
12 व 24 वर्षे सेवा पूर्ण शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करावे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ देण्याचे आश्वासन.
आरोग्य विभागातील ANM, GNM, DOTS कंत्राटी कर्मचाऱ्यांना 15% वाढीव वेतन देण्याची नोंद.
2017 पासून प्रलंबित माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करण्याची नोंद.
या सर्व बाबींचा आढावा घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांनी सर्व विभाग प्रमुखांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, लेखा वित्त अधिकारी नागणे, दामोदरे मॅडम, लेखा अधिकारी घुगे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, अधीक्षक बादने आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीस महासंघाचे राज्य नेते यु. डी. गायकवाड, राज्य सचिव जी. टी. होसुरकर, विभागीय अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे, जिल्हा सचिव किशोर गायकवाड, आरती कांबळे, सुवर्णा आवाळे, यशवंत माने, आर. पि. हिंगे, संजय बोकले, दिलीप जाधव, भाऊराव धडे, दीपक कांबळे, रवी कुरील, अरविंद भोसले, विद्यासागर काळे, दिनेश मांदळे, नवनाथ वाघमारे, बळीराम गायकवाड, सुभाष मस्के, जे. जे. गायकवाड, दिनेश कांबळे, तानाजी कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.