कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुलींवर झालेल्या शारीरिक हिंसाचार प्रकरणी अखेर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर न्यायालयाने थेट संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
या गंभीर विषयाची दखल घेत न्यायालयाने तपासाची जबाबदारी सहायक पोलीस आयुक्त (ACP) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणात न्याय मिळावा आणि पोलिसांवर कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन छेडले होते. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन रीट याचिका दाखल करण्यात आली होती.
👉 या निर्णयामुळे अन्यायग्रस्तांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून समाजात कायद्याचा विजय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.