निलंगा,(प्रतिनिधी)
येथील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. ममता शामसुंदर जखोटिया (राठी) यांची ७४ दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. गुढीपाडव्याच्या रात्री ९.४० वाजता लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. ४ जानेवारी रोजी एका दुर्घटनेत त्या ८५ टक्के भाजल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.
दोन महिन्यापेक्षा अधिक काळ उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या प्रा. ममता राठी यांची प्रकृती मागील काही दिवसात चिंताजनक झाली होती. अखेर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. वाणिज्य विषयात पीएचडी प्राप्त डॉ. ममता राठी त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे आणि यूट्यूब चॅनेलमुळे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.