दादापीर दर्ग्याचे सज्जादे सय्यदशहा हैदरवली नबीरा कादरी यांचे गौरवोद्गार..
निलंगा,दि,२९
निलंगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून शहरातील सर्वपक्षीय गाठीभेटींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लिंबन महाराज रेशमे यांनी निलंग्याच्या लोकआस्थेचे केंद्र असलेल्या दादापीर दर्ग्याचे सज्जादे सय्यदशहा हैदरवली नबीरा कादरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सज्जादे कादरी यांनी लिंबन महाराजांविषयी केलेले मनोगत अत्यंत भावनिक व मनाला स्पर्श करणारे ठरले.
सज्जादे कादरी म्हणाले, “लिंबन महाराज हे आमच्या मनात, आमच्या हृदयात कायमचे वसलेले व्यक्तिमत्व आहे. ते निलंगा शहरातील सर्वसामान्यांच्या जगण्यात मिसळलेले आहेत. जात, धर्म, पंथ कोणताही असो माणूस हा माणूस म्हणून पाहणारी त्यांची दृष्टी आम्हाला नेहमी भावली आहे.”
ते पुढे म्हणाले की, “मदतीसाठी येणारा कोणीही रिकामा परत जात नाही. सढळ हाताने आर्थिक मदत असो वा कुटुंबातील वाद सोडवण्याचे काम असो लिंबन महाराज नेहमी धावून येतात. समाजात सौहार्द, शांतता, मानवता टिकवण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.”
सज्जादे कादरी यांनी मोठ्या आत्मीयतेने नमूद केले की, “लिंबन महाराज माणुसकीलाच धर्म मानतात. जात-पात, धर्म यापलीकडे जाऊन ते सर्वांना समान प्रेम देतात. निलंग्यातील प्रत्येक नागरिकाच्या संकटात उभे राहणारा हात म्हणजे लिंबन महाराज.”
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “अशा साध्या, निरपेक्ष आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाला निलंग्याच्या जनतेने जर नगराध्यक्षपदाची संधी दिली, तर ते राजकारण न करता खऱ्या अर्थाने लोककारण करतील. निलंगा शहरातील सर्वांच्याच अडचणी, मागण्या आणि विकासकामे प्रामाणिकपणे पार पाडतील.”
अखेरीस सज्जादे कादरी यांनी निलंगा वासियांना भावनिक आवाहन करत म्हटले, “लिंबन महाराज हे सर्वधर्मीयांच्या मनात स्थान मिळवलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माणुसकीच्या कार्याचा विचार करून निलंग्याच्या जनतेने विश्वासाचे मत त्यांना द्यावे.”
लिंबन महाराजांच्या या सदिच्छा भेटीमुळे निलंग्यातील धार्मिक व सामाजिक वातावरणात सकारात्मकता वाढली असून सज्जादे कादरी यांनी व्यक्त केलेले मनोगत शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.