लातूर,दि. 16(मिलिंद कांबळे)
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरते. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना निवडणूक व्यवस्थेची जवळून ओळख होते व त्यांच्यात नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि नागरिकत्वाचे भान विकसित होते,” असे मत लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी व्यक्त केले.
ते साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष 2025 – 26 च्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक उपक्रमाच्या समारोप समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे म्हणाले की, “साने गुरुजी विद्यालयाने राबवलेला हा आदर्शवत उपक्रम विद्यार्थ्यांना मतदानाचे स्वरूप, महत्त्व आणि निवड प्रक्रिया जवळून अनुभवण्याची संधी देतो. या उपक्रमांमुळे भविष्यातील जागरूक नागरिक घडतात.”
याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या (नियोजन) शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, सानेगुरुजी शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज माने, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी गोविंद माने, नागोराव कांबळे, उषा राठोड, शाळेचे मुख्यालय इस्माईल शेख, रवी कुलकर्णी आदि उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या, विद्यालयाने राबवलेल्या चुनावी पाठशाळा” अर्थात “विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुक” या उपक्रमात मतदान करणारे सर्व विद्यार्थी हे केवळ शाळेचे विद्यार्थी न राहता, आता आमचे प्रतिनिधी आणि मित्रदेखील झाले आहेत. त्यांची जबाबदारी आता वाढली असून, त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य,नातेवाईक तथा परिसरातील मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगून मतदानासाठी प्रेरित करून मतदानाचा टक्का वाढवावा जेणेकरून लोकशाही जिवंत राहील.
या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीमध्ये 915 विद्यार्थी मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ज्यामध्ये 125 मते घेत चि. ढवळे धैर्यशील बाळासाहेब या विद्यार्थ्याने शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी (SR) म्हणून बाजी मारली तर कुमारी राठोड पुनम अविनाश या विद्यार्थिनीने 115 व चि. धपाटे विनायक अशोक यांनी 106 मते घेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
या निवडणूक प्रक्रियेते शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल शेख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व विभाग प्रमुख गंगाधर डिगोळ यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक इस्माईल शेख यांनी केले तर आभार गंगाधर डिगोळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश परळे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक स्मिता कावळे , शशिकांत पवार, कमल काळगापुरे, मीनाक्षी यादव , सचिन माने, हरिदास कोयले, शिवगंगा जगताप, कोमल डोणगावे, सतीश गायकवाड,अमोल पवार, नवनाथ वडवळे, वैभव धोत्रे , सुनंदा पाटील, दयानंद लहाडे, पौर्णिमा बनसोडे, भरत सूर्यवंशी, सत्यपाल जाधव, लिपिक बालाजी सावंत व सेवक शिवराम चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
Milind kamble, Latur
Mo. 9960049411