
पी.ए फाउंडेशन आणि अस्क इंटरनेशनल ग्रुप ऑफ़ कं. यांच्या संयुक्त विद्दमाने उद्योजक महिला महामेळावा तथा सत्कार समारोह चे आयोजन केले होते. समाजात विविध क्षेत्रात निस्वार्थ कार्य करणाऱ्या महिलांचा / मुलींचा सत्कार करून समाजात वेगळी ओळख तैयार करून त्यांना न्याय व प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. 18 लोकांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक मान. श्यामकुमार बर्वे, खासदार रामटेक लोकसभा मतदार संघ, मान. रश्मेि बर्वे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद् नागपुर, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितिन राऊत, माजी मंत्री तथा आमदार, सुमेधा राऊत, प्रमुख अतिथि धनंजय वंजारी, आय आर एस, इंकम टॅक्स डिपार्टमेंट, नागपुर, सखाराम मंडपे, माजी मुख्याध्यापक, मुकेसिनी लोखंडे, पोलिस निरीक्षक, सी.बी.आय. नागपुर, सिद्धार्थ गायकवाड़, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण नागपुर, प्रीती प्रधाने, सामाजिक कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले, पी. ए फाउंडेशन हे महिलांना / मुलींना प्रोत्साहन देऊन त्याना उद्योजिका बनविण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. महिला ही चूल आणि मूल एवढ्यापर्यंतच मर्यादित राहली नसून आज अश्या सामाजिक संघटनांच्या प्रोत्साहनमुळे राजकीय तसेच इतर सर्वच क्षेत्रात पुढाकार घेत आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझी पत्नी रश्मि बर्वे ज़िल्हा परिषद च्या अध्यक्ष राहिल्या आहेत तसेच देश्याची राष्ट्रपति आज महिला आहे. मला अत्यंत आनंद होत आहे की पी.ए फाउंडेशन महिलांना पुढे आणण्याचे महत्वाचे कार्य करीत आहे. आमदार नितिन राऊत यांनी 1942 ला नागपुर येथे भरलेल्या महिला अधिवेशनाचा उल्लेख करून प्रत्येकाला समाजाचे देंने लागते या भावनेतुन महिला विविध क्षेत्रात आपले नावलौकिक करीत आहेत. व त्यांना पुढे आणण्यासाठी पी.ए फाउंडेशन मोलाचे कार्य करीत असल्याबदल पी.ए फाउंडेशन चे फाउंडर अजय कुमार व सचिना मैडम यांचे कौतुक केले. धनंजय वंजारी यांनी महिलामध्ये जागृति निर्माण करून व त्यांना प्रोत्साहन देऊन समाजात त्यांची वेगळी ओळख करून देण्याचे सराहनीय काम करीत असल्याबदल पी.ए फाउंडेशन चे फाउंडर अजय कुमार व सचिना मैडमच अभिनंदन केले.
अजय कुमार च्या मागे कुठल्याही मोठ्या व्यक्तीचे पाठबळ नसताना त्यांनी शून्यातून हे विश्व निर्माण कैले, विश्वासानी पहिली पायरी चढायची पुढचा प्रवास आपोआप सुखकर होतो याच विश्वासानी त्यांनी आज हजारो महिलाना उद्योजक क्षेत्रात त्यांच्या कठिन परिश्रम, चिकाटी, धैर्य, आत्मविश्वास आणि साहस यामुळेच हे ध्येय गाठले असे मत सखाराम मंडपे यांनी व्यक्त करून याबदल त्यांचे खुप खुप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. सिद्धार्थ गायकवाड़, सुकेसिनी लोखंडे, प्रिती प्रधाने यांनी आपले यथोचित विचार व्यक्त केले.
फाउंडर अजय कुमार यांनी पी.ए फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 5 ते 6 हजार महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला खेड्यापाड्यातील मोठ्या संख्येनी महिला उपस्थित होत्या. प्रस्ताविक सचिना मैडम, संचालन मनीषा फुलझेले तर आभार स्पृहा यांनी केले
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता चे फाउंडर अजय कुमार, सचिना मैडम, राज टेम्भुर्णीकर, सुधीर सोमकुंवर, प्रणय ढोके, अनीता गजभिये, संगीता शेंडे, अमोल शेंडे, शालू सुखदेवे, ज्योती यादव, अपेक्षा तांदळे, प्रेरणा चिवंडे, माला मंडपे, अश्विनी मंडपे, ममता मड़के, शेजल गुडधे, मीना गुडधे, शेजल गौरेकर, छाया मेश्राम, मंजूषा टेम्भुर्णीकर, छकुली, आरजू, यांनी परिश्रम केले.
703060833