
भीषण पूरामुळे मराठवाड्यात हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या संकटाच्या काळात पुणे बार असोसिएशनतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले असून, विश्रांतवाडी वकील परिवाराने या सामाजिक जबाबदारीत सक्रिय सहभाग घेतला आहे.
🛍 आवश्यक मदतीच्या वस्तू:
- बिस्किटे
- कपडे
- चादरी व ब्लँकेट
- औषधे व स्वच्छता साहित्य
- शालेय साहित्य
- आवश्यक किराणा
💰 आर्थिक मदत:
पैशांच्या स्वरूपात योगदान देखील स्वीकारले जाईल.
दिनांक 8 ऑक्टोबर पर्यंत मदत स्वीकारली जाईल.
या आवाहनाला प्रतिसाद देत महिला वकील भगिनींनी प्रत्यक्ष मदत सुपूर्द केली आहे. अँड. जयश्री बिडकर, अँड. जयश्री चौधरी बिडकर, अँड. रेशमा शितोळे, अँड. सोनाली देशमुख, अँड. सीमा गाडेकर, अँड. जया पवार, अँड. माधुरी देसाई, अँड. जयश्री बोडेकर, अँड. अश्विनी बोगम, अँड. नेहा जांभळे, अँड. शिल्पा तापकीर, अँड. शुभांगी बनसोडे, अँड. वनिता खळतकर, अँड. प्रिया कुलकर्णी, अँड. वैशाली देव, अँड. लता सोनवणे, अँड. रणजीत राजपूत, अँड. नवनाथ कंठाली, अँड. रूपाली आंबेकर, अँड. सपना जाधव, अँड. रूपाली गायकवाड आणि अँड. नेहा आनंद यांनी बिस्कीटचे बॉक्स आणि किराणा साहित्य पुणे बार असोसिएशनला सुपूर्द केले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या या मानवी उपक्रमात सहभाग घेणाऱ्या सर्व वकील भगिनींचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. 🙏