मुंबई : नगरपरिषद निवडणुकीत मतदान केंद्रांवर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींचा अवाजवी वावर आटोक्यात आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तीनपेक्षा अधिक वेळा केंद्रावर येण्यास मनाई केली आहे.
आयोगाच्या नव्या नियमांनुसार नियमभंग झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. काही नवे नियम तयार केले आहेत.
मतदानाच्या दिवशी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी केंद्रावर मतदारांच्या निरीक्षणाच्या निमित्ताने प्रत्यक्ष केंद्रात प्रवेश करतात. नव्या नियमानुसार त्यांना आता तीनच वेळा केंद्रातील मतदानस्थळी येता येईल. त्यानंतर येण्याचा प्रयत्न केल्यास किंवा मर्यादित वेळेपेक्षा अधिक काळ तेथे थांबल्यास पोलिसांच्या माध्यमातून त्यांना तेथून बाहेर काढण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.