निलंगा, दि. 22
निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) या आघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षपदासाठी लिंबनअप्पा विश्वनाथअप्पा रेशमे यांची नगरअध्यक्ष पदासाठी अधिकृत घोषणा केली.
या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संभाजी राजे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, शहराध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी “निलंगा शहरात स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी सक्षम, प्रामाणिक आणि लोकमान्य नेतृत्व म्हणून लिंबनाप्पा रेशमे हेच योग्य उमेदवार आहेत.”
नेत्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत “विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार, खड्डेमय रस्ते, पाणीटंचाई तसेच सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष” केल्याचा आरोप केला.
यावेळी विनायकराव पाटील म्हणाले,की,“आघाडीचा उमेदवार जनतेत सतत असलेला, सामाजिक बांधिलकी जपणारा आणि स्वार्थासाठी राजकारण न करणारा आहे. निलंग्यातील प्रत्येक जात-धर्मातील कुटुंबाशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केलेल्या व्यक्तीवर जनतेचा मोठा विश्वास आहे.”
यावेळी संतोष सोमवंशी यांनी सांगितले,की, “नगराध्यक्ष पदावर बसल्यानंतर आमच्या आघाडीचा एकही रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही. नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांचा पगार-भत्ता घेणार नाही, एकही कप चहाचा खर्चही नगरपरिषदेतून केला जाणार नाही.”
असा ठाम दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.
यावेळी निलंग्याच्या पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता, मंदिर मार्ग, शहर विकास योजना या सर्व प्राधान्याने आणि गुणवत्तेसह पूर्ण केल्या जातील. नागरिकांच्या तक्रारी तात्काळ निकालात काढण्यासाठी सूचनापेटी व तत्काळ प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.
शहरातील धार्मिक स्थळे, सार्वजनिक सुविधा, गरीब कुटुंबांचा प्रश्न, महिलांचे प्रश्न, भटक्या-विमुक्त समाज, दलित समाज यांच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल.
आघाडीच्या नेत्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करत म्हटले की,
“निलंग्याचा विकास, पारदर्शक कारभार आणि स्वच्छ प्रशासनासाठी लिंबनाप्पा (महाराज) रेशमे यांना विजय मिळवून देणे गरजेचे आहे.”
यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना तालुका अध्यक्ष
अविनाश रेशमे यांनी आभार मानले…