“विकासाचा निधी खेचून आणण्याची ताकद आमच्यात आहे” : हमीद शेख
निलंगा,दि.२३
नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसतर्फे जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांनी शहरातील जनतेला आवाहन करताना विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले. “राज्यात किंवा केंद्रात सत्ता नसली तरी निलंग्याच्या विकासासाठी आवश्यक निधी खेचून आणण्याची ताकद आणि कौशल्य आमच्याकडे आहे” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, डॉ. भातंबरे, लाला पटेल, अजित माने यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना हमीद शेख म्हणाले, की,“मी वीस वर्षे नगरपालिका सभागृहात काम केले असून एक वर्ष नगराध्यक्ष म्हणून अनुभव घेतला आहे. आज शहरातील रस्ते, नाल्या, काही भागांतील वीजपुरवठा यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. अंधारामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे मागील काळात शहराचा विकास थांबला. आमदार सांगतात 500 कोटींची कामे झाली, पण ती लोकांना दिसत नाहीत; विकास फक्त कागदावर राहिला.”का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, शहराला मॉडेल निलंगा बनवण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे मांडले त्यात प्रामुख्याने
शहरात विस्तृत सीसीटीव्ही कॅमेरे
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका,
नियमित पाणीपुरवठा,
छोट्या व्यावसायिकांसाठी नवे कॉम्प्लेक्स,सोलार दिव्यांची स्थापना,पार्किंग सुविधा,
सार्वजनिक शौचालये, उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले हे कामे राबल्यास निलंगा स्वच्छ, सुरक्षित आणि प्रगत शहर बनेल.
असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चौकट
एमआयएम पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
एमआयएमचे तालुकाध्यक्ष शाहरुख पाटेवाले, लाल टेकडे, प्रसाद फट्टे, साजिद पठाण, जुनेद शेख, बिलाल शेख, अफसर शेख व अन्य कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.