निलंग्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न — नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय
निलंगा (प्रतिनिधी)
आज निलंगा येथे वंचित बहुजन आघाडीची नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठराव एकमताने करण्यात आला.
ही बैठक महिला जिल्हा अध्यक्ष सौ. मंजूषाताई निंबाळकर यांच्या निरीक्षणाखाली घेण्यात आली, तर बैठकीचे अध्यक्षस्थान अंकुश कांबळे यांनी भूषविले.
बैठकीस प्र. ता. अध्यक्ष देवदत्त सूर्यवंशी, वामनदादा कांबळे, मोहनराव सूर्यवंशी, श्रीमंत बनसोडे, अमर सुतके, सचिन कांबळे, सोन कांबळे, अरबाज शेख, आसिफ शेख, महादेव, कुलदीप कांबळे, नकितन गायकवाड, स्वागत सूर्यवंशी, बालाजी कांबळे, किरणकुमार कांबळे, गोविंद सुरवसे, मारुती कांबळे, दिनेश सुरवसे, के. बी. सूर्यवंशी, शुभम सूर्यवंशी, वामन कांबळे, सूर्यकांत कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, साहेबराव कांबळे, प्रलाद कांबळे, अतुल कांबळे, प्रशांत गायकवाड, चंद्रकांत काकणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची विचारधारा आणि कार्य जनतेपर्यंत पोहोचवून संघटन बळकटीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला.