अक्षय धावारे
लातूर,दि.०४
०६ डिसेंबर हा दिवस आंबेडकरी समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणून काळा दिवस मानला जातो. परंतु पानगाव चैत्यभूमी येथे जत्रेचे स्वरूप पाहून समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
समाजाचे नेते अक्षय धावरे म्हणतात, “आम्ही आपल्या बापाला अभिवादन करण्यासाठी आलो आहोत, जत्रा फिरायला नाही. काही लोक पिपाण्या वाजवत, धांगडधिंगा करत आणि धिंगाणा घालत समाजाच्या भावनांचा फज्जा उडवत आहेत. हा दिवस दुःखाचा आहे; त्याचा आदर केला पाहिजे.”
धावरे यांनी पानगाव चैत्यभूमी समिती, लातूर रेणापूर शासकीय अधिकारी, आणि पोलीस यांच्याकडे तातडीने जत्रेचे स्वरूप बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कोणालाही दुकान लावण्यास परवानगी दिली जाऊ नये. अन्यथा, आंबेडकरी समाज स्वतःच्या पद्धतीने जत्रा थांबवेल, आणि या घटनांचे परिणाम पानगाव चैत्यभूमी समितीला उचलावे लागतील.
यावेळी ते म्हणाले, “समाजाच्या भावनांचा फज्जा उडवणाऱ्या कोणालाही माफ नाही. ०६ डिसेंबर हा दिन आम्हा सर्वांसाठी श्रद्धेचा आहे, एन्जॉयमेंटचा नाही. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून जत्रेचे स्वरूप थांबवले पाहिजे.”
समाजाच्या या निर्णयामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्यावर जबाबदारी येत आहे. या घटनांमुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने समाजभावना आणि श्रद्धेचा आदर राखण्यासाठी तात्काळ कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबेडकरी समाजाचे नेते ठाम आहेत की, भावनांचा अपमान झाल्यास त्याचे परिणाम गंभीर असतील. त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला आवाहन केले आहे की, पानगाव चैत्यभूमीवर जत्रा बंद करण्यासाठी त्वरित आदेश द्यावा आणि कोणालाही दुकान उभारण्यास परवानगी देऊ नये.