टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोशाने परिसर दुमदुमला..
निलंगा,दि.२०
मौजे कासार शिरसी ता.निलंगा येथील माघ वारी पायी दिंडी सोहळा ( वाडी) कासार शिरसी व श्री विठ्ठल रुक्मिणी परिवार सार्वजनिक माघवारी पायी दिंडी सोहळा बडूर,हासोरी, हालसीवाडी, हालशी हत्तरगा ते पंढरपूर या दोन पायी दिंड्यांचे प्रस्थान मंगळवार दिनांक 20 रोजी अनेक मान्यवर व येथील मठाचे मठाधिपती गुरुमुर्गेंद्र स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या निमित्त शहरातील प्रमुख मार्गावर झाडू संतांचे मार्ग या न्यायाने दिंडी मार्ग सडासमार्जनासह रांगोळ्याने सुशोभित करण्यात आला होता.

प्रतिवर्षाप्रमाणे कासार शिरसी येथून माघवारीनिमित्त विणेकरी बुद्धिवंत बिराजदार व नागनाथ स्वामी तर विठ्ठल रुक्मिणी परिवार दिंडीचे विणेकरी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज हासुरीकर यांच्या अधिपत्याखाली या दिंड्यांचे प्रस्थान येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून झाले या वारकऱ्यांना गुरु मुर्गेंद्र स्वामी यांनी निरोप दिला या दिंड्यात परिसरातील 1500 पेक्षा जास्त भाविकांनी सहभाग नोंदवला यात महिलांचा सहभाग मोठा असल्याचे दिसून आले तर डोंगरगाव हत्तरगा हलशी कुन्हाळी हत्तरगा मुळज कदमापूर बडूर नेलवाड औंढा सायखान चिंचोली हंद्राळ कोराळी कोरळवाडी शिरशी वाडी रामलिग मुदगड मुदगवाडी भगतवाडी कोराळी जाजन मुगळी हरीजवळगा भूत मुगळी या गावातील वारकऱ्यांचा समावेश आहे.
मंगळवार तारीख 20 रोजी निघालेल्या या दिंड्या बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी उमरगा जळकोट नळदुर्ग सोलापूर मार्गे पंढरपूरला पोहोचतील यासाठी सर्वश्री हरिभक्त परायण बसवराज काजारे महावीर पाटील दामू बंडगर सुभाष यमदे यांचे सह मधुकर किवडे मोहन धायगुडे अनिल जानकर हे विशेष परिश्रम घेत आहे..