निलंगा,दि. 17
मूळचे चोंडी (ता. उदगीर) व नोकरी निमित्त अलिबाग (रायगड) येथे स्थायिक झालेले प्रभाकर रामराव गायकवाड (वय 71) यांचे अमेरिकेतील सिएटल येथे आज सकाळी 6 वाजता (IST) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
प्रभाकर गायकवाड हे 1980-85 दरम्यान गावातील व समाजातील पहिले पोस्ट ग्रॅज्युएट होते. शिक्षणानंतर ते नोकरीच्या शोधात मुंबईत दाखल झाले आणि RCF (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) मध्ये टेलेक्स ऑपरेटर म्हणून रूजू झाले. पुढे अलिबाग (थळ) येथे प्रशासनिक अधिकारी म्हणून काम करत त्यांनी सेवानिवृत्ती घेतली.
त्यांचा लहान मुलगा प्रफुल्ल नोकरी निमित्त मागील 12-13 वर्षांपासून अमेरिकेत असून, 17 ऑगस्ट 2025 रोजी आई-वडिलांना पर्यटनासाठी अमेरिकेत घेऊन गेला होता.
आज (दि. 17) पहाटे वॉकिंगसाठी बाहेर असताना अचानक छातीत वेदना झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
अमेरिकेतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात येणार असून यासाठी 4 ते 5 दिवस लागू शकतात.
निलंगा येथील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते डी. के. सूर्यवंशी यांचे सासरे तसेच LIC विमा प्रतिनिधी जयश्री डी. सूर्यवंशी यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
मिलिंद कांबळे, निलंगा
मो. 9960049411