
निलंगा, ३० जुलै (मिलिंद कांबळे)
ऑर्किड इंग्लिश स्कूल, निलंगा येथील विद्यार्थिनी प्रेरणा प्रदीप मुरमे हिने माध्यमिक शाळांतून इंग्लिश मिडियममधून निलंगा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिने दहावीच्या परीक्षेत ९७.६० टक्के गुण मिळवले आहेत.
तिने विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशाबद्दल ऑर्किड एज्युकेशनल अकॅडमीच्या संगीताताई पाटील निलंगेकर, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदुरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंग भिकणे, आर.पी.आय.चे राज्य सरचिटणीस विलास सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. भगवत पोंळ, प्राचार्य डॉ. माधव कोळपुके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड, प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष राम काळगे, सचिव जतिंग मेहत्रे, पत्रकार मिलिंद कांबळे, मुख्याध्यापक एस.एन. सिर्मळे, प्रा. दयानंद चोपणे, अनिल देवसाळे, पंकज शेतकार, बाळासाहेब बिराजदार आदींनी अभिनंदन केले आहे.
निलंगा / मिलिंद कांबळे
मो. ९९६००४९४११