लातूर,दि.15
मराठवाड्यात व विदर्भात यावर्षी पुराने थैमान घातले आहे. नद्या नाल्यांना पूर येऊन उभ्या पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्या. शेतकऱ्यावर ओढवलेल्या अस्मानी संकटाच्या दुःखात सहभागी होत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी एक दिवस अन्नत्याग करून उपवास करावा व त्यातून संकलित झालेली व स्वेच्छा देणगीतून जमा झालेली रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांना मदत करावी असा निर्णय शहाड( कल्याण) जिल्हा .ठाणे येथील राज्य कार्यकारणी मध्ये घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने समितीचे राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार व लातूर शहर कार्याध्यक्ष डॉ. गणेश गोमारे यांनी लातूर व धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून निधीच्या मर्यादेत सारसा ता.जि.लातूर या गावातील पाच कुटुंबाची व जळकोट तालुक्यातील बेळ सांगवी येथील मारुती रायकवाडे या आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबाची निवड केली होती, विदर्भातील वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील गौळ या गावी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे ठरले, धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा या गावच्या पाच कुटुंबाची व उमरगा तालुक्यातील आलूर या गावातील तीन व्यक्तींना औषधोपचारासाठी मदत करण्याचे ठरले .या मदतीत स्नेहल लांडगे या लातूर शाखेच्या कार्यकर्तीने तिच्या अश्वमेध अभ्यासिकेतील विद्यार्थी मित्रांकडून जमवलेल्या तीन हजार रुपयाची भर घालण्यात आली आली .अशी एकूण 72600 रुपयाची मदत आपत्तीग्रस्तांना पोहोचविण्याचे ठरले,त्याप्रमाणे राज्य प्रधानसचिव रुकसाना मुल्ला, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ.दशरथ भिसे, लातूर शहर कार्याध्यक्ष डॉक्टर गणेश गोमारे जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले शहर कार्याध्यक्ष डॉ. गणेश गोमारे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे, प्रधान सचिव प्रा. बालाजी राऊत, राष्ट्रसेवा दलाचे अजित शिंदे, जळकोट शाखेचे किशनराव सोनटक्के प्रकाश मर्तुळे,अनंतराव धूळशेटे, दिनकर रायकवाडे प्रा. प्रताप शिंदे ,कबीर सय्यद या सर्वांच्या उपस्थितीत गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. गरजू शेतकरी कुटुंबाला मदत पोहोचविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी व अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले, त्याबद्दल जिल्हा शाखा लातूर व लातूर शहर शाखेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.