
लातूर,दि.22(मिलिंद कांबळे)
बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाला 2027 मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये एक लाख सैनिक निर्माण करून बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्याचे मनोदय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांनी संकल्प व्यक्त केला आहे. त्या धर्तीवर औसा तालुका शाखेच्या वतीने सारोळा येथे 21 सप्टेंबर, 2025 रोजी विश्वशांती बुद्ध विहार सारोळा ता. औसा जि. लातूर येथे एक दिवसीय तालुका स्तरीय समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत चालले यामध्ये लाठी, काठीसह इतरही प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य संघटक तथा लातूर जिल्हा प्रभारी आयु. प्रा. बापूसाहेब गायकवाड सर यांच्या हस्ते संपन्न झाले व असिस्टंट लेफ्टनंट जनरल आयु. राजाराम साबळे यांनी मार्गदर्शन केले, डिव्हिजन ऑफिसर विकास दंतराव, कंपनी कमांडर नानासाहेब आवाड, जिल्हा सचिव देवराव जोगदंडे यांनी प्रशिक्षण दिले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष आयुनि. कविताताई कांबळे यांनी कालाम सुत्त या विषयावर धम्म प्रवचन दिले तर औसा तालुकाध्यक्ष आयु. कैलास सोनकांबळे अध्यक्षस्थानी होते. कोषाध्यक्ष मारुती कांबळे येळीकर यांनी सूत्रसंचालन केलं, तालुका सरचिटणीस दिलीप बौद्धवीर, समता सैनिक दल औसा तालुकाप्रमुख श्याम सुरवसे, सचिव रंगनाथ कांबळे, औसा महिला तालुकाध्यक्ष आयुनि. कीर्तीताई कांबळे, शाखा अध्यक्ष इस्माईलकांत लोखंडे, 87 उपासक उपासिका युवक युवती यांनी समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आहे. यावेळी सारोळा, भादा व औसा तालुका चे पदाधिकारी उपस्थित होते. शिबीर संपन्नतेसाठी प्रकाश लोखंडे, निखिल लोखंडे, प्रकाश कांबळे विशाल वाघमारे दयानंद गायकवाड या सर्वांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.