निलंगा,दि.०३
नगरपरिषद निवडणुकीची धुरळण उडू लागलेल्या निलंग्यात मोठे राजकीय वळण पाहायला मिळाले. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते भरत चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ,निलंगा येथे जिल्हा अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या नेतृत्वात झालेल्या कार्यक्रमात भरत चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ. मंजुताई निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
गरीब मराठा समाजाच्या न्यायाच्या लढ्यात ठामपणे उभे राहण्यासाठी आणि निलंगा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांना ताकदीने आवाज देण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची निवड केल्याचे भरत चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला निवडणूक प्रचारात महत्त्वाची गती मिळाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांत दिसून आली.
कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते डॉ. हिरालाल निंबाळकर, तालुका प्रभारी देवदत्त सूर्यवंशी, पक्षाचे सर्व पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा प्रवेश वंचित बहुजन आघाडीसाठी मोठा राजकीय बूस्टर मानला जात असून यामुळे आगामी समीकरणे कोणत्या दिशेने झुकतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.