लातूर, दि.२७
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बालरंगभूमी परिषद, शाखा लातूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला लातूरमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल ८५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून संविधानाबद्दलची जागरूकता आणि अभ्यासू वृत्ती प्रकट केली.
स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये आयोजित करण्यात आली होती. तीन गटांसाठी शब्दमर्यादा अनुक्रमे
पहिली ते चौथी 250 शब्द,
पाचवी ते सातवी 500 शब्द,
आठवी ते दहावी : 750 शब्द अशी शब्द मर्यादा होती.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. विवेक सौताडेकर, प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, प्रा. प्रशांत मुगळे आणि लक्ष्मण वासमोडे या तज्ञ परिक्षकांनी केले.
तिन्ही गटांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यात प्रथम क्रमांक विजेते खालील प्रमाणे त्यात
मुस्कान शेख, प्रज्ञा जगताप, सिद्धी भूतडा, मृणाल सूर्यवंशी, नंदिनी पवार, तन्मय बोरकर, श्रेयश देवकते
द्वितीय क्रमांक
अमृता भोळे, नेहा कांबळे, यश पाटील, जागृती साळुंके, श्रद्धा चोपडे, खुशी बट्टेवार, सोहम महामुनी, आनंदी गंभीरे
तृतीय क्रमांक
प्रणव फड, भार्गवी सोमवंशी, संकेत शेरीकर, पियुषा शेटे
उत्तेजनार्थ
आकांक्षा चौधरी, प्रविण गाथाडे, संस्कृती कांबळे
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या राज्य अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अॅड. निलमताई शिर्के-सामंत, राज्य उपाध्यक्ष तथा नाट्य लेखक-दिग्दर्शक अॅड. शैलेश गोजमगुंडे, परिषद लातूरचे अध्यक्ष रणजित आचार्य, ओमप्रकाश झुरुळे, सोनू डगवाले, हरी तुगावकर, राजन अयाचित आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा प्रमुख भिमराव दुनगावे यांच्यासह शाखा उपाध्यक्षा सुवर्णा बुरांडे, हिरा वेदपाठक, मयूर राजापूरे, रवि अघाव, रविकिरण सावंत तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात विशेष प्रयत्न केले.