लातूर,दि.३०
लातूर शहरातील जयभीमनगर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या जयंती समितीच्या अध्यक्षपदी शंकर गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी अजय जोगेश्वरी तर सचिवपदी सारनाथ सोनकांबळे यांची निवड करण्यात आली.
जयभीमनगर येथील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी कोषाध्यक्षपदी निलेश गायकवाड, सहसचिव चेतन वाघमारे, सहकोषाध्यक्ष आकाश ढगे यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागार म्हणून संग्राम वाघमारे, सचिन फुले, अविनाश सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली असून मार्गदर्शक म्हणून अविनाश बर्गे भैया, विशाल भाऊ गवळी, अभिमन्यू तात्या लामतुरे, मारुती चक्रे आणि किशोर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
बैठकीस तनुजा कांबळे, अनिल क्षीरसागर, राहुल बनसोडे, सुहास सोनकांबळे, लखन पात्रे, विलास सातपुते, बाबासाहेब थोरात, दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.