निलंगा, दि. 14
शाश्वत शेती–समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत ;दि. 14 नोव्हेंबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा तालुक्यातील विविध गावांमध्ये आज प्रक्षेत्र भेट व मासिक चर्चासत्र पार पडले. तूर, हरभरा, ज्वारी यांसह केळी,पपई, पेरू, सीताफळ, ड्रॅगनफ्रूट या फळबागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जागेवरच सोडविण्यात आल्या.
दौऱ्यात डॉ. सचिन डिग्रसे व डॉ. वसंतराव सूर्यवंशी यांनी रोगग्रस्त झाडांचे निदान, प्रतिबंधात्मक उपाय, खत व्यवस्थापन, सिंचन तंत्र आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक पद्धती सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले.
उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचे कौतुक
निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी प्रतिकूल परिस्थितीतही उत्कृष्ट फळबागा आणि आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले.
ते म्हणाले,
“विद्यापीठाने ठरवून दिलेल्या हेक्टरी उत्पन्नापेक्षा जास्त उत्पादन निलंगा तालुक्यातील शेतकरी घेत आहेत. हवामान बदलाचा विचार करून पीक पद्धती बदलणे अत्यावश्यक असून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची गरज आहे.”
तूर, हरभरा, ज्वारी,कांदा पिकांची स्थिती
केळी,पपई, पेरू, सीताफळ, ड्रॅगनफ्रूट, , फळबागांचे निरीक्षण
रोगनियंत्रण, खत नियोजन, सिंचन व्यवस्थापन
शेततळे व सेंद्रिय पद्धतींचा आढावा
प्रक्रियाकेंद्र, गुळ पावडर,, काजू प्रक्रिया युनिट पाहणी
भेट दिलेली गावे
गौर, हणुमंतवाडी मुगाव, केळगाव, निलंगा, अनसरसवाडी, हलगरा, वळसांगवी, कलांडी –
असरवाडा येथे 2 हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोडाऊन तसेच राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने तुन घेतलेले किसान ड्रोन याची पण पहाणी केली
यावेळी• डॉ. सचिन डिग्रसे – मांजरा कृषी संशोधन केंद्र, डॉ. वसंत सूर्यवंशी – कृषी विस्तार विद्यावेत्ता,
तालुका कृषी अधिकारी, नाथराव शिंदे – निलंगा,सचिन बावगे – अहमदपूर, नितीन कांबळे – रेणापूर, शिवचंद्र पाल जाधव – चाकूर, प्रमोद राठोड – लातूर
, दत्तात्रेय हाके – औसा, संदीप वळकुंडे – उदगीर, संजयकुमार ढाकणे – शिरूर अनंतपाळ, कृष्णा मुंडे – देवणी, कृषी पर्यवेक्षक – सुनील घारुळे, वाघमारे, येवले, कदम, साहेबराव सोनकांबळे
या प्रक्षेत्र भेटीत शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे समाधान करत आधुनिक शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.