निलंगा(वा)
निलंगा येथे युवक काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे निलंगा तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे, जनावरांचे व शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने घोषित केलेली नुकसानभरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने आज प्रशासनाला निवेदन देत तातडीने मदत रक्कम वितरित करण्याची मागणी केली.
या प्रसंगी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव महेश शोभाबाई लहू म्हेत्रे, युवक काँग्रेस देवणी तालुका अध्यक्ष शरण लालू, निलंगा विधानसभा सरचिटणीस अमोल नवटक्के, तसेच इतर युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा युवक काँग्रेसचा सातत्यपूर्ण प्रयत्न पुढेही सुरू राहील, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.